‘कोरोना’मुळे भारताला निर्यातीचा विस्तार करण्याची संधी : सुब्रमण्यम

0
43


कोलकाता : चीनमध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. अशा स्थितीत भारताला निर्यातीचा विस्तार करण्याची संधी मिळाली आहे, असे मत मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यन यांनी व्यक्त केले आहे. ते इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये बोलत होते.

देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यन म्हणाले, भारत हा चीनचा आशियामधील सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. मात्र, भारताची चीनबरोबरील व्यापारात मोठी तूट आहे. कोरोनाचा चीनबरोबरील व्यापारावर किती परिणाम होणार, हे सांगणे खूप कठीण आहे. सार्सचा अनुभव लक्षात घेता भारतावर मोठा परिणाम होणार नाही.

कोरोनामुळे निर्यात-व्यापार करण्याची भारताला चांगली संधी आहे. त्यासाठी निर्यातक्षम मॉडेल राबवावे लागणार आहे. चीनमधून भारत मोठय़ा प्रमाणात सुट्टे भाग, असेंब्ल्स, कंपोनन्टस अशा गोष्टींची आयात करण्यात येते. त्यानंतर भारतामधून निर्यात करण्यात येते. मोबाईल उत्पादनात तेच मॉडेल वापरण्यात येते. जर या दृष्टीने तुम्ही पाहिले तर ही भारताला चांगली संधी आहे.

राष्ट्रीय सकल उत्पन्नाबाबत (जीडीपी) सुब्रमण्यम म्हणाले, आर्थिक सर्वेक्षणानुसार पुढील आर्थिक वर्षात जीडीपी ६ ते ६.५ टक्के राहणार आहे. ग्रामीण उपभोक्तता आणि भांडवली खर्च यावर केंद्रीय अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. कोणत्याही अर्थव्यवस्थेत विकासदर हा स्थिर नसतो. त्या श्रेणीत असण्यासाठी आपल्याला सरासरी असावे लागते. आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये वास्तविक देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाचा दर हा ५ टक्के राहील, असा त्यांनी अंदाज व्यक्त केला.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here