केंद्र सरकार २०० फायटर जेट्स खरेदी करणार

0
37


कोलकाताः भारताच्या हवाई दलात लढाऊ विमानांची कमतरता भासू नये, यासाठी केंद्र सरकार लवकरच २०० फायटर जेट्स विमान खरेदी करणार असल्याची माहिती संरक्षण सचिव अजय कुमार यांनी आज कोलकाता येथे दिली. हवाई दलात गेल्या काही दिवसांपासून फायटर जेटची संख्या कमी झालेली आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले असल्याचे ते म्हणाले. तसेच हिंदुस्तान अॅरोनॉटिकल्स लिमिटेडकडून तयार करण्यात येत असलेले ८३ तेजस लढाऊ विमानांचे कंत्राट शेवटच्या टप्प्यात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

संरक्षण सचिव अजय कुमार यांनी आज कोलकातामध्ये ही माहिती दिली आहे. ते म्हणाले, ८३ लढाऊ विमाना शिवाय ११० अन्य विमानांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. त्यामुळे एकूण २०० लढाऊ विमान खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आम्ही ८३ तेजस लढाऊ विमानांच्या कंत्राटाला लवकरच अंतिम रूप देणार आहोत. त्यामुळे भारताला आपल्या हवाई सुरक्षासाठी तात्काळ लढाऊ विमान मिळतील. तेजस फायटर जेट्सला हवाई दलात समावेश कधी करणार असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर त्यावर बोलताना ते म्हणाले, आम्ही लवकरच ही प्रक्रिया पूर्ण करणार आहोत.

भारतीय हवाई दलात सध्या मिराज २०००, सुखोई ३० एमकेईआय आणि मिग-२९ यासारखे लढाऊ विमान आहेत. याशिवाय जॅग्वार आणि मिग २१ बायसन यांचाही समावेश आहेत. परंतु, ही विमाने आता काळाच्या ओघात जुनी झाली आहेत. विशेष म्हणजे, मिग २७ या लढाऊ विमानाने अखेरचे उड्डान केले आहे. कारगिल युद्धाच म्हत्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या मिग २७ या लढाऊ विमानाचे जोधपूर एअरबेसवर जवळपास ४ दशके सेवा दिल्यानंतर अखेरचे उड्डाण केले. या लढाऊ विमानाने कारगिल युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच पाकिस्तान ठिकाणावर अचूक मारा करीत त्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले होते.


भाजपकडून मोदींची छत्रपती शिवरायांशी तुलना

‘देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना जेलमध्ये टाकणार’

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here