कुत्रा आणि चक्क बसने प्रवास?

0
163
eclipse dog travel by bus

जर तुम्ही आपल्या लहान मुलांना एकट्याने सार्वजनिक बस मधून प्रवास करायला देण्यापासून घाबरत असाल तर ही बातमी नक्की वाचा.

चला भेटूया Eclipse ला.

Eclipse हे एका कुत्रीचे नाव आहे. ती एक संमिश्र जातीची आहे, म्हणजेच ब्लॅक लाब्राडोर आणि मास्टिफ या दोन जमातीपासून तिचा जन्म झाला आहे आणि ती अतिशय मोहक आहे.

तर असं काय खास आहे या Eclipse मध्ये, ही वॉशिंग्टन येथील सिएटल येथे राहणारी आहे. महत्वाचं म्हणजे हिला पार्क मध्ये फिरायला जायला आवडते, आणि त्यासाठी तिला कोणाची सोबत देखील लागत नाही.

dog travelling by bus

आपल्या घरापासून ते वॉशिंग्टन येथील सिएटल येथे पार्क मध्ये जाण्यासाठी ती चक्क बसचा वापर करते आणि ते पण एकट्याने. ऐकून थक्क झालात ना? हो खरं आहे आणि कोणताही विनोद वगैरे नाही.

त्याच झालं असं Eclipse नेहमीच आपल्या मालक जेफ सोबत बसने पार्क पर्यंतचा प्रवास करायची. एके दिवशी बस यायला उशीर झाला आणि म्हणून जेफ सिगारेट पीत एका बाजूला उभा असतो आणि तेवढ्यात बस येते, आधीच वाट बघून वैतागलेली Eclipse जेफ येत नाही हे पाहून बसमधे उडी घेते आणि बस सुटते.

कुत्रा आणि चक्क बसने प्रवास?

नेहमीच त्या बसने ती प्रवास करत असल्यामुळे बसचा चालक तिला ओळखतो आणि नेहमी प्रमाणे तिला पार्कच्या बसस्टोपवर उतरतो, तो पर्यंत तिचा मालक जेफ देखील पार्क मध्ये पोहचतो आणि मग काय त्यादिवसापासून Eclipse एकट्याने पार्क पर्यंतचा प्रवास बसने करते.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, नेहमी प्रवास करताना तिला पैसे नाही लागत? तर लक्षात घ्या ती अमेरिकेत राहते आणि तिकडे गोष्टी नियमांतच होतात. Eclipse च्या गळ्यातील कॉलरमध्ये तिचे रोजच्या प्रवासाचे तिकीट लावलेले असते.

This is Eclipse. Every day she leaves her house, by herself, and takes the bus downtown to the dog park where she spends…

Posted by Robbie Lauren on Sunday, December 29, 2019

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here