किसान सन्मानच्या वंचित लाभार्थ्यांना न्याय द्या…

[ad_1]

शेतकऱ्यांची तहसील कार्यालयावर धडक ; कर्मचाऱ्यांच्या अनागोंदी कारभाराचा शेतकऱ्यांना फटका…

मालवण, ता. २८ : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी तालुक्यातून २०२० पासून सुमारे ३ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरले. मात्र अनेक फॉर्म कोणतेही कारण न देता रद्द झाले. उर्वरित फॉर्म मंजुरीबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही.

तहसील कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांच्या कारभाराबाबत संतप्त बनलेल्या शेतकऱ्यांनी आज येथील तहसील कार्यालयावर धडक देत तहसीलदार वर्षा झालटे यांच्यासमोर आपल्या भावना मांडत न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली.

शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या व वेळकाढू कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसता नये. पात्र लाभार्थ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे. अशी आक्रमक भूमिका बाबू टेंबुलकर व अन्य शेतकऱ्यांनी यावेळी मांडली.
तहसीलदार वर्षा झालटे यांची भेट घेत शेतकऱ्यांनी चर्चा केली.

यावेळी शेतकरी मागील दोन वर्षे तहसील कार्यालयाचे उंबरे झिजवत आहेत. मात्र संबंधित कर्मचारी टोलवाटोलवीची उत्तरे देण्यापलिकडे काही करत नाहीत. आपण काही दिवसांपूर्वी नव्याने पदभार स्वीकारला आहात.

कर्तव्यदक्ष तसेच शेतकरी व सर्वसामान्य जनतेबाबत संवेदनशील असणारे अधिकारी म्हणून आपली ओळख आहे. तरी याप्रश्नी आपण लक्ष घालून मागील तीन वर्षांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा.

अशी मागणी उपस्थित शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे केली. यावेळी प्रांत स्वाती देसाई, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे उपस्थित होते.

शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन माजी नगरसेविका पूजा करलकर, सुकळवाड तंटामुक्ती अध्यक्ष बाबुराव मसुरकर, बाळा टेंबुलकर, कट्टा ग्रामपंचायत सदस्य बाबू टेंबुलकर, अजय मयेकर, उमेश पाताडे, विनायक मयेकर, सरपंच युवराज गरुड, स्वप्नील गावडे, अल्का पाटकर, लक्ष्मण हडकर, सखाराम गावडे, गजानन परब यांसह कट्टा, सावरवाड, पेंडूर, हेदुळ, खोटले, डिकवल, आचरा, चौके, आंबेरी, साळेल, मसुरे, आचरा, सुकळवाड येथील शेतकरी उपस्थित होते.

२०२० पासून सुमारे फॉर्म भरणा केलेल्या शेतकऱ्यांना सर्व कागदपत्रे योग्य असूनही मंजुरी मिळत नाही. शेतकऱ्यांना सतत तहसील कार्यालयात यावे लागते. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. अशी भूमिका पूजा करलकर, बाबू टेंबुलकर, मसुरकर यांनी मांडली.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना तसेच शेतकऱ्यांचे अन्य प्रश्न सोडवण्यासाठी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गावागावात महसूल, महा ई सेवा केंद्र व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने कॅम्प आयोजित केले जाणार आहेत.

शेतकऱ्यांच्या समस्या सोडवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तालुका प्रशासन प्रयत्नशील असल्याचे तहसीलदार वर्षा झालटे यांनी उपस्थितांना सांगितले.

दरम्यान गावात कोणत्या दिवशी कॅम्प लावले जाणार आहेत त्यांची माहिती शेतकऱ्यांना अगोदर द्या. म्हणजे शेतकऱ्यांना त्याठिकाणी वेळेत उपस्थित राहावे सोईस्कर ठरेल असे बाबू टेंबुलकर यांनी सांगितले.

[ad_2]

Related Posts

मुंबई–कोंकण प्रवास आता फक्त ४ ते ५ तासात! ‘रेवास–रेड्डी कॉस्टल हायवे’ बनेल कोंकणातील खेळ बदलणारा प्रकल्प 🚀

कोंकण, ८ जून २०२५ – मुंबई ते सिंधुदुर्ग असा सुमारे ४०० किमीचा प्रवास आता फक्त ४ ते ५ तासांत साध्य होणार आहे. हे शक्य करणारा ‘रेवास–रेड्डी कॉस्टल हायवे’ (MSH‑4) प्रकल्प…

Continue reading
मालवण: कोकण किनारपट्टीवरील नयनरम्य ठिकाण (Malvan: Kokan Kinarpattiwaril Nayanramya Thikana)

महाराष्ट्राच्या नयनरम्य कोकण किनारपट्टीवर वसलेले मालवण हे एक सुंदर पर्यटनस्थळ आहे. स्वच्छ निळे समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले, आणि रुचकर सी-फूडसाठी मालवण हे नेहमीच पर्यटकांच्या पसंतीस उतरले आहे. जर तुम्ही शांत आणि…

Continue reading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

🔥 “एक गोणी खताची किंमत ₹1350 असताना शेतकऱ्यांकडून ₹1600 पर्यंत वसुली!”

  • By Editor
  • June 20, 2025
  • 45 views
🔥 “एक गोणी खताची किंमत ₹1350 असताना शेतकऱ्यांकडून ₹1600 पर्यंत वसुली!”

🌧️ पावसाळ्यातील त्वचेची काळजी: नैसर्गिक उपाय आणि टिप्स

  • By Editor
  • June 18, 2025
  • 18 views
🌧️ पावसाळ्यातील त्वचेची काळजी: नैसर्गिक उपाय आणि टिप्स

🛑 पुण्यात पूल कोसळला, अनेक जण वाहून गेले

  • By Editor
  • June 15, 2025
  • 17 views
🛑 पुण्यात पूल कोसळला, अनेक जण वाहून गेले

Ahmedabad Plane Crash News: अहमदाबाद विमान अपघातात एका संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत

  • By Editor
  • June 13, 2025
  • 29 views
Ahmedabad Plane Crash News: अहमदाबाद विमान अपघातात एका संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत

एअर इंडियाचे लंडनकडे जाणारे विमान अहमदाबादमध्ये कोसळले; २४२ जण होते प्रवासात

  • By Editor
  • June 12, 2025
  • 24 views
एअर इंडियाचे लंडनकडे जाणारे विमान अहमदाबादमध्ये कोसळले; २४२ जण होते प्रवासात

IPLचा ‘Lucky Charm कोण आहे माहितीय का?

  • By Editor
  • June 12, 2025
  • 25 views
IPLचा ‘Lucky Charm कोण आहे माहितीय का?