Connect with us

देश

एकाच वेळी रनवेवर समोरासमोर आली दोन विमानं,महिला पायलटच्या प्रसंगावधानामुळे वाचले अनेकांचे प्राण

Published

on

[ad_1]

दिल्ली : दिल्ली विमानतळावर (Delhi Airport) बुधवारी (23 ऑगस्ट) रोजी एक मोठी दुर्घटना टळली आहे. एकाच रनवेवर विस्तारा एअरलाइन्सची (Vistara Airlines) दोन विमानं एकत्र पोहचली. यामध्ये एक अहमदाबादवरुन दिल्लीला आलेलं एक विमान होतं आणि एक दिल्लीवरुन बागडोगराला जाणारं विमान होतं. यावेळी अहमदाबादवरुन येणाऱ्या विमानातील एका महिला पायलटच्या प्रसंगावधनामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

नेमकं काय घडलं?

अहमदाबादवरुन येणारं दिल्ली विमानतळावर लँड होणार होतं. पण त्या विमानाची पायलट असलेल्या महिलेने त्याच रनवेवरुन दुसरं विमान टेक ऑफ होताना पाहिलं. त्यानंतर त्यांनी लगचेच एअर ट्रॅफिक कंट्रोलला याबद्दल माहिती दिली. त्यामुळे एक मोठा अपघात होण्यापासून टळला आहे. या दोन्ही विमानांमध्ये 500 पेक्षा अधिक प्रवासी होते.

याप्रकरणी कोणती कारवाई करण्यात आली?

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, डीजीसीए या प्रकरणात सखोल चौकशी करणार आहे. तसेच याप्रकरणी संबंधित हवाई वाहतूक नियंत्रकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. डीजीसीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटलं की, ‘विस्तारा एअरलाइन्सचे अहमदाबादवरुन दिल्लीला जाणारे वीटीआय 926 या विमानाचा या घटनेमध्ये समावेश होता. हे विमा रनवे 29 वर उतरलं. पण वाहतूक नियंत्रण कक्षाने त्यांना रनवे 29 आर पार करण्याचे निर्देश दिले होते. त्याचवेळी नियंत्रण कक्षाने त्याच रनवे वरुन विस्ताराची वीटीआय 725 या विमानाला टेक ऑफ करण्याची परवानगी दिली.’

डीजीसीएनं काय म्हटलं?

डीजीसाएच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं की, ‘त्याच रनवे वरुन दोन्ही विमानं लँड आणि टेक ऑफ करणार आहेत हे नियंत्रण कक्षाला काही क्षणांसाठी लक्षात आलं नाही. त्यामुळे त्यांनी विस्ताराच्या दुसऱ्या विमानाला टेक ऑफ करण्याची परवानगी दिली. परंतु ज्या क्षणी महिला पायलटने वाहतूक नियंत्रण कक्षाला सतर्क केले त्याच क्षणी या विमानाचे टेक ऑफ रद्द करण्यात आले.’ दरम्यान या प्रकरणी विस्तारा एअरलाइन्सकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

तर डीजीसीए या प्रकणात आणखी तपास करत आहेत. कोणंतही विमान लँड होण्यापूर्वी आणि टेक ऑफ करण्यापूर्वी हवाई नियंत्रण कक्षाची परवानगी घेतं. जर हवाई नियंत्रण कक्षाने परवानगी दिली तरच ते विमान त्या विमानतळावर टेक ऑफ आणि लँड करु शकतं. त्यामुळे यामध्ये हवाई नियंत्रण कक्षाची भूमिका महत्त्वाची असते. या प्रकरणात हवाई नियंत्रण कक्षाच्याच हे लक्षात न आल्यानं या रनवेवर मोठा अपघात झाला असता. पण महिला पायलटच्या प्रसंगावधनामुळे हा अपघात टळला.

[ad_2]

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *