‘एअर इंडिया’वर ८८ वर्षानंतर पुन्हा टाटा समूहाची मालकी?

0
46


मुंबई : ज्या एअरलाईन्सचा जेआरडी टाटांनी ८८ वर्षापूर्वी पाया घातला होता, ती पुन्हा टाटांची होणार असल्याचे दिसून येत आहे. अडचणीत आलेल्या एअर इंडियासाठी १७ मार्चपर्यंत निविदा मागविण्यात आल्या आहेत आणि टाटा समूह यासाठी आपली दावेदारी अंतिम करण्याच्या स्थितीत आहे. टाटा समूह सिंगापूर एअरलाइन्सच्या सहकार्याने एअर इंडियासाठी बोली लावण्याच्या तयारीत आहे, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोघांनी मिळून ही बोली लावण्यासाठी काम सुरू केले आहे.

१९३२मध्ये जेआरडी टाटांनी एअर इंडियाचा पाया रचला होता आणि १९४६ मध्ये त्याचे राष्ट्रीयीकरण झाले. सुरुवातीला ते टाटा एअरलाइन्स म्हणून ओळखले जात होते, राष्ट्रीयीकरणानंतर १९४८मध्ये त्याला एअर इंडिया असे नाव देण्यात आले. आता ही विमान कंपनी पुन्हा एकदा टाटाच्या समूहात परतू शकते. टाटा ग्रुप एअर इंडिया विकत घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. यामध्ये एअर एशिया इंडियाचे विलीनीकरण (टाटाचे यात ५१ टक्के भागभांडवल आहे) आणि एअर इंडियाची १०० टक्के उपकंपनी एअर इंडिया एक्स्प्रेसचा समावेश आहे.

टाटा समूहाने एअर एशियामध्ये
४९ टक्के भागधारक असलेल्या मलेशियन उद्योजक टोनी फर्नाडिस यांच्याकडेही संपर्क करून एअर इंडिया एक्स्प्रेस खरेदी करण्यासाठी परवानगी मागितली आहे. भागधारक करारानुसार फर्नाडिस तयार नसल्यास, टाटा समूह अन्य कोणत्याही एअरलाईन्समध्ये १० टक्केपेक्षा जास्त गुंतवणूक करू शकत नाहीत.

सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच नवीन करारावर स्वाक्ष-या होऊ शकतात. टाटा समूहाने एअर एशिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसचा विलीनीकरण प्रस्ताव तयार केला आहे. या विलीनीकरणामुळे फर्नाडिसचा भारतीय विमानचलन क्षेत्रातील मोठा वाटा होईल, त्यामुळे दोन्ही पार्टनरचा विजय होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

एअर एक्स्प्रेस आणि एअर एशिया कुठे आहेत?
एअर इंडिया एक्स्प्रेसने २० भारतीय शहरांमध्ये उड्डाण केले. या व्यतिरिक्त, आखाती देश आणि दक्षिण आशियाई देशांमध्ये १३ आंतरराष्ट्रीय गंतव्य स्थानांवरही त्याचे अस्तित्व आहे. त्यांच्या ताफ्यामध्ये २५ बोईंग ७३७ आहेत, तर एअर एशियाच्या बाबतीत त्यात २९ एअरबस ए ३२० आहे आणि ते २१ शहरांमध्ये सेवा देतात.

परदेशी उड्डाणांच्या मंजुरी मिळण्यास अडचणी
एअर एशिया इंडिया परदेशी उड्डाणांच्या परवानगीच्या प्रतीक्षेत आहे. एअर एशिया बोर्डावरील फर्नांडिस, टाटा नॉमिनी आर. वेंकटरामन यांच्यावर गुन्हेगारी खटले आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरण सुरू आहे. फर्नांडिस यांना ५ फेब्रुवारी रोजी ईडीने समन्स बजावले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here