Connect with us

महाराष्ट्र

ईशाळवाडी दुर्घटना ग्रस्त व्यक्तिंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप.

Published

on

उरण दि. 6 (विठ्ठल ममताबादे )सामाजिक बांधिलकी जपत कोणताही स्वार्थ दृष्टीकोण न ठेवता समाजाच्या सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था उरण व गोवठणे विकास मंच या दोन सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने खालापूर तालुक्यातील ईर्षाळवाडी येथे दरड कोसळून मृत्यूमुखी पडलेल्या मृत नातेवाईकांच्या सुख दु:खात सहभागी होत त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

अतिवृष्टी व दरड कोसळल्याने दुर्घटनाग्रस्त कुटुंब बेघर झाले. त्यांना कोणाचाच आधार राहिला नाही. त्यामुळे थोडाफार का होईना त्यांना मदत करण्याच्या दृष्टीकोनातून श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था उरण व गोवठणे विकास मंचच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

यावेळी श्री. छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील,कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे, हेमंत पवार,
व गोवठणे विकास मंचचे अध्यक्ष सुनिल वर्तक, उपाध्यक्ष अनंत वर्तक, खजिनदार संदीप पाटील, सचिव प्रेम म्हात्रे आदी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

प्रत्यक्ष पीडित व्यक्तींच्या हातात मदत देण्यात आली.यावेळी मृत व्यक्तींचे नातेवाईक असलेले चौक ग्रामपंचायतचे सदस्य अंकुश वाघ यांच्याकडे सर्व मदत सुपूर्द करण्यात आली. यावेळी पीडित नागरिकांनी घडलेली सर्व हकीकत सांगितली.

त्यामुळे परिस्थिती किती भयानक होती याचा अंदाज संस्थेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना आला.श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था उरण व गोवठणे विकास मंचचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पीडित व्यक्तींची विचारपूस करून त्यांना मदत करून परत आपल्या मार्गाकडे प्रस्थान झाले.ज्यांनी ज्यांनी या पवित्र कार्याला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष हातभार लावला त्या सर्व मान्यवरांचे यावेळी दोन्ही संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *