इंदिरा गांधींच्या कर्तृत्त्वाबद्दल प्रचंड आदर, माज्या भाषणाचे अर्थ-अनर्थ काढले : जितेंद्र आव्हाड

0
39


मुंबई : बीडमधील माज्या भाषणाचे अर्थ-अनर्थ काढले जात आहेत. पण इंदिरा गांधींना मानणारा मी राजकीय कार्यकर्ता आहे. इंदिरा गांधी यांच्या असामान्य कर्तृत्त्वाबद्दल मला प्रचंड आदर आहे, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिलं आहे. आणीबाणीच्या माध्यमातून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता, असं जितेंद्र आव्हाड बीडमधील संविधान महासभेत केलं. या वक्तव्यावर काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करुन स्पष्टीकरण दिलं.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “बीडमधील माझ्या भाषणाचे अर्थ अनर्थ काढले जात आहेत. मी स्पष्ट सांगतो, इंदिरा गांधींना आदर्श मानणारा राजकीय कार्यकर्ता आहे, ज्याच्या रक्तामध्ये काँग्रेस आहे. काँग्रेस पक्ष म्हणून नाही तर काँग्रेस ही लोकचळवळ आहे जी महात्मा गांधींजींची होती. संयुक्त महाराष्ट्रासह मुंबई झालीच पाहिजे हा निर्णय जेव्हा आला, तेव्हा यामागील प्रमुख भूमिका इंदिरा गांधींची होती. पंतप्रधान झाल्यानंतर बँकांचं राष्ट्रीयकरण, राजा-महाराजांचे तनखे बंद करणं, ७१ साली पाकिस्तानचे दोन तुकडे करणं, सिक्कीम खेचून घेऊन समाविष्ट करणं, चीनला धक्का देणं, पोखरणला अणुचाचणी घेणं. पण ७५ ते ७७ च्या काळामध्ये त्यांच्या काही भूमिकांमुळे लोकशाहीच्या मूलभूत अधिकारांवर गदा येतेय असं इथल्या जनतेला वाटू लागलं. काही जण त्यांच्या बाजूने होते, काही विरोधात होते. या सगळ्याविरुद्ध ७४ साली विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केलं आणि कालांतराने त्याचं नेतृत्त्व जयप्रकाश नारायण यांनी केलं, ७७ साली इंदिरा गांधींचा पराभव झाला. हा इतिहास आहे.

देशात जेव्हा जेव्हा लोकशाहीच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणली जाते, असं जनतेला वाटतं, तेव्हा जनता पेटून उठते. आज अमित शाह आणि मोदींविरोधात तेच घडतंय. माझं म्हणणंच ते आहे आणि मी ठामपणाने बोलतो, जर या देशात इंदिरा गांधींचा पराभव होऊ शकतो, ज्यांच्याएवढं कर्तृत्त्व कोणाचंच नव्हतं, तर मोदी आणि अमित शाह कोण आहेत? माझे मित्र किरीट सोमय्यांनीही लक्षात ठेवावं, मी इंदिरा गांधींचा समर्थक आहे आणि मला लाज नाही वाटत सांगायला. इंदिरा गांधींची तुलना मोदी-शाहांशी होऊच शकत नाही.”

जितेंद्र आव्हाड काय बोले होते

बीड : एकेकाळी देशात इंदिरा गांधींनी देखील असाच लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार केला होता, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. बीड येथील संविधान बचाव महासभेत जितेंद्र आव्हाड बोलत होते. यावेळी त्यांनी देशात आज ठिकठिकाणी विद्यार्थ्यांवर हल्ले होत आहेत. अनेक महाविद्यालयात हे हल्ले होत आहेत. हे सर्व अचानक का होत आहे ? असा सवालही उपस्थित केला.

आज देशातील परिस्थिती पाहता, इंदिरा गांधींनीही असेच लोकशाहीचा गळा एकेकाळी घोटण्याचा प्रकार केला होता. देशात त्यावेळी असणा-या परिस्थितीबाबत बोलायला कोणीही तयार नव्हते. परंतु अहमदाबाद आणि पटना येथील विद्यार्थ्यांनी इंदिरा गांधी यांच्या धोरणाविरोधात आवाज उठवला. त्याचकाळात जयप्रकाश नारायण यांचे आंदोलन सुरु झाले आणि इंदिरा गांधी यांचा पराभव झाला. हा इतिहास परत एकदा महाराष्ट्रात आणि देशात घडेल, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

जेव्हा देशातील आजची परिस्थिती बदलेल तेव्हा त्याचे श्रेय जेएनयु, हैद्राबाद यूनिवर्सिटी यांना द्यावे लागेल, असे आव्हाड यावेळी म्हणाले. आज विद्यार्थी बिनदिक्कतपणे बाहेर पडत आहेत. लोकांना कायदा समजावून सांगत आहेत. आज जरी त्यांची संख्या कमी असेल, तरिही हळूहळू ती वाढेल आणि हेच विद्यार्थी देशाला दुसरी आझादी मिळवून देतील, असा विश्वास जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here