Connect with us

क्रिडा

“आपण बॅझबॉल क्रिकेट खेळू शकत नाही”, असं का म्हणाला अश्विन?

Published

on

[ad_1]

सध्या जगभरात आंतरराष्ट्रीय क्रिकेट हे अत्यंत आक्रमक पद्धतीने खेळले जात आहे. नुकत्याच संपलेल्या ऍशेस मालिकेत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांनी जबरदस्त खेळ दाखवत पाच सामन्यांची मालिका अखेरचा सत्रापर्यंत जिवंत ठेवली होती.

त्याचसोबत भारताने वेस्ट इंडीजविरुद्ध तर पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध अशाच आक्रमक खेळाचे प्रदर्शन केलेले. याच पार्श्वभूमीवर भारताचा आघाडीचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने एक मोठे वक्तव्य केले आहे.

मागील दीड वर्षापासून इंग्लंड क्रिकेट संघाने कसोटी क्रिकेट खेळण्याचा एक नवा मंत्र जगाला दिलेला दिसतो. बेन स्टोक्स कर्णधार व ब्रँडन मॅकलम प्रशिक्षक बनल्यापासून इंग्लंडने कसोटीत वनडे स्टाईल फटकेबाजी करत विरोधी संघांवर दबाव आणला आहे.

ऍशेस मालिकेत पहिले दोन सामने गमावल्यानंतरही त्यांनी दोन विजय मिळवून मालिका बरोबरीत सोडवली. विशेष म्हणजे त्यांनी या पद्धतीने क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यापासून एकाही मालिकेत पराभव स्वीकारला नाही.

भारतीय संघ देखील अशाच प्रकारे कसोटी क्रिकेट खेळेल का असे विचारल्यावर अश्विन म्हणाला,

“मला अजिबात वाटत नाही की भारतीय संघ अशा पद्धतीचे क्रिकेट खेळू शकेल. कारण, आपल्याकडे एखादा फलंदाज हॅरी ब्रूकप्रमाणे खेळताना बाद झाला तर, त्याला संघातून बाहेर केले जाते. सलग दोन सामने हरल्यानंतरही आपण तोच संघ खेळवण्याची हिंमत दाखवू का?

आपल्याकडे त्यावेळी कमीत कमी चार बदल केले जातील. इंग्लंड संघ असा खेळत आहे, कारण त्यांना त्यांच्या संघ व्यवस्थापन व प्रेक्षकांचा पाठिंबा आहे. आपल्याकडे ही परिस्थिती नसते.”

अश्विन जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतिम सामन्यात न खेळल्याने भारतीय संघ व्यवस्थापनावर मोठी टीका झालेली. त्यानंतर अश्विनने वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक बळी मिळवत पुनरागमन केलेले.

(R Ashwin Said Team India Never Play Like Bazzball Cricket)

[ad_2]

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *