आता सुतार, प्लम्बरही जीएसटी नोंदणीच्या कक्षेत

0
41


नवी दिल्ली : सेवा देणा-या एकल व्यावसायिकांचीही वस्तू व सेवा करांतर्गत (जीएसटी) नोंदणी करण्याचा सरकारचा विचार आहे. यामध्ये विशेषत: ऑनलाइन मंचावरून व्यवसाय करणा-या एकल व्यावसायिकांचा समावेश असणार आहे. इलेक्ट्रिशियन, सुतार, प्लम्बर, ब्युटिशियन अशा एकल व्यावसायिकांचा, ज्यांनी आपल्या व्यवसायाची माहिती ऑनलाइन अॅपवर किंवा मंचावर नोंदवली आहे आणि ते या माहितीच्या आधारे व्यवसाय करत आहेत, अशांना जीएसटी अंतर्गत नोंदणी करावी लागणार आहे.

गुड्स अॅण्ड सव्र्हीसेस नेटवर्क (जीएसटीएन) अंतर्गत या सर्व व्यावसायिकांची नोंदणी केली जाईल. त्यासाठी उद्योग प्रोत्साहन व अंतर्गत व्यापार विभाग नियमावली तयार करत आहे. यानुसार, अर्बनक्लॅप, हाऊसजॉय तसेच ब्रोफॉरयू यांसारख्या ऑनलाइन मंचांना अशा व्यावसायिकांची नोंदणी करून घेताना त्यांची जीएसटी नोंदणी झाली आहे किंवा काय हे पाहणे बंधनकारक होईल. अशा एकल व्यावसायिकांनी ऑनलाइन मंचावर नोंदणी करताना त्यांच्याकडे जीएसटी क्रमांक असणे बंधनकारक होणार आहे. ही माहीत एक वरिष्ठ सरकारी अधिका-याने दिली आहे.

अनेक प्लम्बर, इलेक्ट्रिशियन, वैयक्तिक फिटनेस प्रशिक्षक, ब्युटिशियन विविध ऑनलाइन मंचांवर स्वत:ची नोंदणी करून व्यवसा करतात. यापैकी बव्हंशी व्यावसायिकांची वार्षिक उलाढाल ४० लाख रुपयांपर्यंतही असते. अशा व्यावसायिकांना जीएसटीमधून मोकळे सोडणे योग्य नव्हे. तसेच हे व्यावसायिक लोकांच्या घरी जाऊन सेवा देतात. यामध्ये कोणतीही गफलत झाली किंवा घरातील व्यक्तींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला तर या व्यक्तींचा माग काढणे अवघड होते. त्यामुळेही या व्यावसायिकांची सूची तयार करण्याचा सरकार आग्रह धरत आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here