Connect with us

देश

आतापर्यंत 5 कोटी ITR दाखल, करदात्यांना इनकम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी फक्त 72 तास शिल्लक

Published

on

Income Tax Return: तुम्ही अद्याप 2023-24 आर्थिक वर्षासाठी टॅक्स (Income Tax) रिटर्न भरले नसेल, तर अजिबात वेळ वाया न घालवता लगेच ITR भरा. आयटीआर फाईल करण्यासाठी करदात्यांकडे आता फक्त तीन दिवस म्हणजेच, 72 तास शिल्लक आहेत. अशातच आतापर्यंत पाच कोटी करदात्यांनी टॅक्स रिटर्न फाईल केलं आहे, स्वतः आयकर विभागानं ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

आयकर विभागानं करदाते आणि टॅक्स प्रोफेशनल्सचे आभार मानले आहेत. तसेच, ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, 5 कोटी आयटीआरचा टप्पा गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन दिवस आधीच गाठला गेला आहे. कर विभागानं सांगितलं की, 27 जुलै 2023 पर्यंत पाच कोटी आयटीआर दाखल करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी 30 जुलैपर्यंत 5 कोटी आयटीआर दाखल करण्यात आले होते.

प्राप्तिकर विभागाच्या म्हणण्यानुसार, 27 जुलैपर्यंत दाखल केलेल्या 5.03 कोटी ITR पैकी 4.46 कोटी ITR ई – व्हेरिफाय झाले आहेत. आतापर्यंत दाखल केलेल्या सर्व ITR पैकी 88 टक्के ITR ई-व्हेरिफाय झाले आहेत. व्हेरिफाय केलेल्या 4.46 कोटी ITR पैकी 2.69 कोटी ITR ची प्रोसेसिंग करण्यात आली आहे.

आयकर विभागानं सांगितलं की, आयकर विभागाचा हेल्पडेस्क करदात्यांसाठी आयटीआर भरणं, कर भरणं आणि इतर संबंधित सेवांसाठी 24 तास उपलब्ध आहे. करदात्यांना कॉल, लाईव्ह चॅट, वेबेक्स सेशन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत केली जात आहे.

या सुविधा 31 जुलै 2023 पर्यंत उपलब्ध असतील, असे आयकर विभागानं सांगितलं आहे. शनिवार आणि रविवारीही या सेवा करदात्यांना उपलब्ध राहतील. आयकर विभागानं अशा करदात्यांना आवाहन केलं आहे की, ज्यांनी मूल्यांकन वर्ष 2023-24 साठी अद्याप टॅक्स रिटर्न फाईल केलं नसेल, त्यांनी मुदतीच्या शेवटच्या दिवसापर्यंत न थांबता तात्काळ ITR भरावे.

31 जुलै आहे शेवटची तारीख

यंदा आयकर विवरणपत्र भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. यंदाच्या वर्षी आयकर विवरण भरण्यासाठी मुदत वाढवण्यात येणार की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे आयकर विभागाने करदात्यांना लवकरात लवकर आयकर विवरण दाखल करण्याचे आवाहन केले आहे.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *