Connect with us

मनोरंजन

‘आई मला रामायण, महाभारत बघू देत नव्हती कारण…’; लोकप्रिय अभिनेत्रीकडून बालपणीच्या आठवणी सांगताना विचित्र खुलासा

Published

on

Konkona Sen Sharma : आपण सगळेच लहाणपणापासून रामायण आणि महाभारत या महाकाव्यांवर आधारीत मालिका आणि चित्रपट पाहत मोठे झालो. इतकंच नाही तर त्याच्यावर आधारीत अनेक कार्टुन्स देखील आपण पाहिले. त्यासाठी आपल्या मनात एक वेगळी भावना आहे. दरम्यान, अयान मुखर्जीच्या ‘वेक अप सिड’ या चित्रपटात आयशा ही भूमिका साकारणारी अभिनेता कोंकणा सेन शर्मानं याविषयी एक मोठा खुलासा केला आहे. कोंकणा सेननं खुलासा केला की तिची आई अपर्णा सेन तिला रामायण आणि महाभारत पाहायला देत नव्हती. त्यासोबत तिची आई अमेरिकी सोप ओपेरा देखील पाहू देत नव्हती. त्याचं कारण आता तिनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.

कोंकणा सेननं फिल्म कंपेनियनला दिलेल्या मुलाखतीत याविषयी खुलासा केला आहे. तिच्या आईनं तिला कधीच टिव्हीवर रामायण आणि महाभारत पाहू दिलं नाही. याविषयी सांगताना कोंकणा सेन म्हणाली की, ‘मला रामायण आणि महाभारत पाहायची इच्छा नव्हती. मी आधी ही महाकाव्य वाचावी आणि मग पाहावी असं मला सांगितलं होतं. आईनं सांगितलं की महाकाव्य पाहताना कोणत्याही व्यक्तीच्या कल्पनेनं नाही पाहायचं, ते पाहतांना तुझी स्वत: ची एक कल्पना असणं महत्त्वाचं आहे.’

कोंकणानं हे देखील सांगितलं की तिच्या आईनं तिला कधीच हिंदी आणि बंगाली चित्रपट पाहण्याची परवाणगी नव्हती आणि तिला वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट पाहण्याची संधी मिळाली. याविषयी बोलताना ती पुढे म्हणाली की, ‘त्याशिवाय, मला द बोल्ड अॅन्ड द ब्यूटीफुल किंवा सांता बारबरा सारख्या अमेरिकेच्या सोप ओपेरा पाहण्याची परवाणगी नव्हती.’

पुढे याविषयी आणखी काही गोष्टी सांगत कोंकणा सेन म्हणाली, ‘मी तर फक्त एक लहाण मुलगी होती. तरी देखील, ज्या प्रकारे त्यांनी मला मोठं केलं. मला नेहमीच स्वत: एक स्थान दिलं. त्यामुळे मला असं वाटतं की त्यामुळे मला खूप मदत मिळाली आहे.’

कोंकणा सेनविषयी बोलायचे झाले तर ती अपर्णा सेन आणि पत्रकार मुकुल शर्मा यांची लेक आहे. तर कोंकणानं वयाच्या चौथ्या वर्षी करिअरची सुरुवात केली होती. तिच्या जबरदस्त अभिनयानं तिनं स्वत: ची एक ओळख मिळवली. तिच्या अभिनयानं सगळ्यांच्या मनावर राज्य केलं. कोंकणा ही 43 वर्षांची असून कुत्ते या चित्रपटात दिसली.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *