अर्थक्रांतीसाठी ज्ञानयुगातील संधीचा उपयोग करा : काकोडकर

0
47


सोलापूर : प्राचीन काळात भारत शेतीप्रधान होता आणि आजही आहे. त्याकाळात सर्व देशांच्या तुलनेत भारताचे दरडोई उत्पन्न सर्वात जास्त होते. नंतरच्या काळात हे दरडोई उत्पन्न कमी होत गेले. ज्ञानयुगामध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत. भारताच्या प्रगतीमध्ये सर्वात जास्त महत्व सेवा विभागाला आहे. उच्च शिक्षणाची वाटचाल त्यादिशेने होणे गरजेचे आहे,अर्थक्रांती घडवायची असेल, विषमता दूर करायची असेल तर ज्ञानयुगात उपलब्ध होणा-या उपलब्ध होणा-या संधीचा जास्तीत जास्त उपयोग करायला हवा, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी केले.

पुण्योक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्गत नॅक व आयक्यूएशी विभाग आणि मराठी विज्ञान परिषद सोलापूर शाखेच्या वतीने डॉ. अनिल काकोडकर यांचे तयारी ज्ञानयुगासाठी या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. संशोधन व विकास आणि उद्योगावर ज्या प्रमाणात भर दिला पाहिजे, ज्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक केली पाहिजे पाहिजे त्या प्रमाणावर केली जात नाही. ज्ञानात नवीन भरीव भर टाकणे हे संशोधनाचे महत्त्वाचे काम आहे परंतू तसे होताना दिसत नाही. आजची शिक्षण व्यवस्था व्यवस्था कालबाह्य ठरत असून शिक्षणाच्या दर्जा उंचावण्याची गरज निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

शिक्षणातून सुजाण व सुसंस्कृत नागरिक घडविणे आणि शिक्षणाच्या माध्यमातून उपजीविका निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी योग्य वातावरण निर्माण करायला हवं, जगाच्या गतीने पुढे जाण्यासाठी आपण गतिमान व्हायला हवं, त्याकरिता संशोधन वाढविणे गरजेचे असल्याचे मतही डॉ. अनिल काकोडकर यांनी यावेळी व्यक्त केले. आत्मपरीक्षण करून संधी शोधणे आणि आपल्या संशोधनावर आपला विश्वास असणे हे कोणत्याही देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक असणारी बाब आहे. ग्रामीण भागाच्या संदर्भात जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा उपयोग व्हायला हवा. ज्ञानयुगात समाज आणि अर्थकारण यांचा घनिष्ठ संबंध असायला हवा. पैशापेक्षा मूल्य निर्मिती महत्त्वाची महत्त्वाची निर्मिती महत्त्वाची असल्याने माज्याबरोबरच मी आणखी किती जणांची प्रगती करू शकतो याचा विचार सर्वांनी केला तरच ज्ञानयुगाची आपण तयारी करत आहोत असे म्हणणे योग्य ठरेल, असेही प्रतिपादन डॉ.अनिल काकोडकर यांनी आपल्या मार्गदर्शनात व्यक्त केले.

अध्यक्षीय समारोप करताना कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस म्हणाल्या, विद्यापीठास सिलेज अंतर्गत राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाकडून ५० लाख रुपयांचे अनुदान मिळाले असून यासंदर्भात संलग्नित महाविद्यालयाचे प्राचार्य व संकुलाचे संचालक व शिक्षक यांची बैठक घेतली. त्यांना समाजोपयोगी प्रकल्प तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले. सिलेजअंतर्गत अंतरविद्याशाखीय व समाजासाठी उपयुक्त प्रकल्प करण्यावर विद्यापीठाकडून भर दिला जाणार आहे. या प्रकल्पामध्ये शिक्षकांबरोबरच विद्यार्थ्यांनाही समाविष्ट करून घेण्यावर विद्यापीठाचा भर आहे. यामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी यावेळी केले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here